S
Sachin Khare
October 6, 2025 at 07:31 AM

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/

सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक .

      भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर्यटकांची तुंबळ गर्दी बघायला मिळते . सहाजीकच निसर्गाने दिलेली साद कोणाला ऐकू येत नाही . तुम्हालाही ऐकू येत असेलच ना ? खास करुन रविवार हा वार भटकंतीसाठी लोकप्रिय आहे कारण बहुतेक जणांना रविवारी सुट्टी असतेच . परंतू आमचा कार्यक्रम मात्र बरोबर त्या ऊलट असतो . म्हणजे आमचा सलून व्यावसाय रविवारी फुल्ल . त्यामुळे आम्ही इतर दिवशी निसर्गाच्या हाकेला साद देत असतो . कित्येक दिवसांपासून काही नवनवीन ठिकाणं डोक्यात घर करून बसलीत . त्यापैकी एक म्हणजे सांडवली चा धबधबा होय . खुप जणांकडून ऐकलं होतं या ट्रेकमध्ये अद्भुत निसर्गाचे दर्शन होते म्हणून . आणि कोणताही निसर्गवेडा एखादा ट्रेक पहील्यांदाच करणार असतो त्यावेळी त्याची ऊत्सुकता शिगेला ताणली गेलेली असते . तस तर पावसाळ्यात आपल्या रांगड्या महाराष्ट्रात सगळीकडेच निसर्गाची ऊधळण होत असते . पण आपली जन्मभुमी , कर्मभूमी असलेल्या साताऱ्याच्या मातीतील इथल्या हिरव्या गर्द झाडीतून भटकताना आपले निसर्गाशी असलेले अतुट नाते आणखीनच घट्ट होत जाते .मी तर बऱ्याच वेळा निसर्गाचे रूपडे बघून भाऊक होऊन जातो . अशा वेळेस माझ्या मनात निसर्गा- प्रतीची असलेली इज्जत आणखीनच वाढते . 

        गेल्या आठवड्यातच सांडवली धबधब्याकडे भटकंतीला जायचे म्हणून माहिती काढली . तर या ट्रेकमध्ये एका विशिष्ठ जागेवर पाण्यातून नदी ओलांडावी लागते . आणि त्याच दिवशी पाऊस जास्त झाल्याने नदीला पाणी वाढल्याचे कळाले आणी तीकडे जायचे पुढे ढकलावे लागले .नंतर 15 ऑगस्ट ला सोमवारी जायचे पक्के झाले . माझा मित्र सचिन घोरपडे याने त्याचा मित्र जो सांडवली  ट्रेकचे आयोजन करणार होता त्यांच्या ग्रुप मध्ये आम्हाला जॉईन व्हायचे ठरविले . पण आम्ही आमच्या गाडीतून म्हणजेच थार मधून जाण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर ' त्या ' ग्रुप ची वाट बघत बसलो . त्या मित्राने कित्येकदा फोन करून सुद्धा एकदाही फोन उचलला नाही . शेवटी कंटाळून आम्ही सर्वांनी आपणच स्वतःची गाडी घेऊन सांडवलीला निघण्याचे ठरविले . पुढे जाऊन नाक्यावरुन राज पुरोहीत ची जिलेबी आणि फरसाण घेऊन निघणार तोच 'त्या ' मित्राचा फोन आला की मला म्हणजे त्याला काल रात्री कुत्रे चावले त्यामुळे मी येऊ शकत नाही . परंतू मी तुम्हाला गाईड गाठून देतो . असे आश्वासन त्याने दिले आणि पुर्ण केले . त्याप्रमाणे समर्थ मंदीरहून स्वप्निल हा गाईड  आमच्या सोबत सामील झाला .आम्ही एकून  सातजन परळी खोऱ्याकडे निघालो . त्यामध्ये मी आणि माझे मित्र  सचिन , चेतन , दिपक , बंटी आणि हो माझा लाडका पुतणेश श्रेयश,  आम्हाला गाईड करणारा स्वप्निल  . खरं तर कुठलाही गाईड हा नंतर मित्रच बनत असतो . 

    आठ दिवस अगोदर सांडवली धबधब्याचे व्हिडिओज  सारखे सारखे बघीतल्यामुळे माझे मन तर जणू काही गाडी पोहचायच्या आगोदर धबधब्याच्या पायथ्याला पोहचले होते . शेवटी आमची थार गाडी खाचखळग्यातून चिखलातून आम्हाला अलगद नेऊन गाडीतळावर जाऊन विसावली होती . तत्पूर्वी उरमोडी धरणाचे नयनरम्य  फोटोही कॅमेरॅत विसावले होते . गाडीतून उतरून ट्रेक ला सुरुवात करताच पाचव्या मिनिटाला सर्वांच्या बुटांच्या नाकातोंडात पाणी शिरलं होतं . तिथल्या जमीनीवरील पायवाटा देखील पाण्याच्या प्रवाहाने झाकून टाकल्या होत्या . त्यामुळे चालताना जास्तीत जास्त पाण्यातूनच जावे लागत होते . त्याचवेळी रिमझीम पावसाच्या सरी स्वागत करत होत्या . तिथलं वातावरण एवढं सुंदर होत की तासापुर्वी शहरात होतो हे विसरूनच गेलो होतो आम्ही . दहा टक्के पांढरा रंग तो फेसाळलेल्या नदीच्या पाण्याचा , तीस टक्के पोपटी रंग गवताचा आणि भातशेतीचा उरलेला साठ टक्के गडद हिरवा रंग हा जंगलातील वृक्षवल्लींचा असा तो नजारा डोळयांचा बाहूपटलांवर तरळत होता . इकडं पाहू की तीकडं पाहू माझातर असा गोंधळ होत होता . कारण कितीही भारी लेन्सच्या कॅमेरॅपेक्षा आपल्या डोळ्याच्या लेन्सेसमधून डोक्याच्या मेमरी चीप मध्ये साठणाऱ्या आठवणी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रहात असतात . नदिकडे पहिला कटाक्ष टाकताच क्षणी असे वाटत होते की धो धो पावसाने नदिच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह गर्वाने छाती काढून तीचा पसारा केवढा आहे हे दाखवत होता . प्रचंड पाण्याचा आवाज हा तुम्ही शहरातील नेहमीच्या कर्कश गोंगाटापासून लांब इथे जंगलात आहात याची जणू काही तंबीच देत होता . इथे फक्त जंगलाचा म्हणजेच निसर्गाचाच कायदा चालतो हेही बजावत होता . ही सर्व भावना जेव्हा तुम्ही निसर्गातील प्रत्येक कणाकणाशी सच्चा दिलाने एकरूप झाला तरच  ती कळते असा माझा अनुभव आहे .

       आम्ही पुढे जात असताना अजस्त्र वृक्षांनी वेलींनी जंगलाची वेगळ्या रूपातच ओळख करुन दिली होती . एका झाडाशी मनोमन बोलोस्तोपर्यंत शेजार चे झाड त्याची वेगळीच कहानी सांगायचे . त्यांच्या शेजारी जमीनीवर वेगवेगळ्या प्राण्यांच्या पडलेल्या विष्टा बघून रात्रीच्या काळोखात जंगल प्राण्यांच्या रूपाने जणू काही पहाराच देत असेल असे वाटत होते . फेसाळणाऱ्या नदिच्या  काठाने आम्ही स्वच्छ जंगलातून पुढे जात होतो . स्वच्छ याकरीता की आम्ही चालताना देखील पायवाटेवरून नडगीभर पाण्यातून चालावे लागत होते . असा माझातरी पहिलाच अनुभव होता . ती एक खास जागा शोधण्यासाठी आमची धरपड चालू होती , जीथून त्या नदीचा प्रवाह कमरे एवढया पाण्यातून पार करत पलीकडच्या काठाला जायचे होते आणि त्याच वाटेने अजस्त्र सांडवलीच्या धबधब्याकडे जाता येणार होते . तेवढा एकच पर्याय होता .मी सहजच कमरे एवढ्या पाण्यातून म्हणालो पण त्या दिवशी त्या परिसरात धो धो पाऊस झाल्यामुळे नदिचे पात्र कोणत्याही साधणांशिवाय  पार करने एक अशक्य काम होते . ते पाणी कमरे एवढे नसून गटांगळ्या खाण्याइतके जरूर होते . 

कृपया सगळालेख इथं बसत नाही त्यामुळे वरिललिंक वर जाऊन बघा

4 Likes
2 Comments112 Views

Comments2

F
Fort SeekersOct 6, 2025

छान लिहिला आहे

1
P
Pramod PudaleOct 6, 2025

अफलातून वर्णन 👏🙌

1

Similar Posts

कोकण दिवा ट्रेक करायचा आहे. आमचा 15 जणांचा ग्रुप आहे. शनिवारी रात्री मुक्काम आणि रवीवार पहाटे 5 वाजता ट्रेक सुरु करायचा प्लॅन आहे. पायथ्या ला मुक्कामाची सोय आहे का? शाळा किंवा मंदिर..कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कृपया शेअर करा.

कोकण दिवा ट्रेक करायचा आहे. आमचा 15 जणांचा ग्रुप आहे. शनिवारी रात्री मुक्काम आणि रवीवार पहाटे 5 वाजता ट्रेक सुरु करायचा प्लॅन आहे. पायथ्या ला मुक्कामा...
Mar 30, 2026

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe
Dec 7, 2025

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ला आहे. त्याच्या चारही बाजूंनी खंदक आहे आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच त्या किल्ल्याखाली अनेक भूमिगत (

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ल...
Jan 20, 2026

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)
Jan 16, 2026

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही
Jan 11, 2026