कमळगड: कोंढवली गावातून गड चढून, गडावर फिरून, गड उतरायला किती वेळ जातो? कोणाला माहिती असल्यास कृपया सांगा
कमळगड: कोंढवली गावातून गड चढून, गडावर फिरून, गड उतरायला किती वेळ जातो? कोणाला माहिती असल्यास कृपया सांगा
कमळगड: कोंढवली गावातून गड चढून, गडावर फिरून, गड उतरायला किती वेळ जातो? कोणाला माहिती असल्यास कृपया सांगा
कमळगडाची चढाई सोपी आहे त्यामुळे २ तास एवढा वेळ पुरेसा आहे पूर्ण गड फिरून उतरायला.
दादा कमळगड ला जायला 3 ते 4
वाटा त्यातली सर्वात सोईस्कर म्हणजे नांदगणे गावातून, कोंढवली त्यामानाने कमी चालीची पण खडी चढाई त्यामुळे दमछाक होते 2:30 तास लागतील जर एकसारखी चाल ठेवली तर गडावरील लोक हिच वाट वापरतात, ही वाट तुम्हाला डायरेक्ट गडाच्या जंगलाच्या मागील बाजूने आणून सोडते.
कोंढवली गाव म्हणजे वीर जिवा महाले यांची जन्मभूमी.
बाकी वासोळे मार्गे 3 ते 3:30 तास
आकोशी मार्गे 2:30 तास
जर नवीन असाल तर नांदगणे मधून जाऊ शकता.
वाह, खूप छान माहिती. नांदगाने गावातून चढायला किती वेळ लागेल अंदाजे?
नांदगणे मधून पण 2:30 तास लागतील पण चढाई कमी आहे,
वाटेत कोठेही पाणी नाही तुम्हाला गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे पाण्याचं कुंड आहे तिथे पाणी मिळेल लिंक खाली आहे वरच्या वस्तीतील लोक सुद्धा इथूनच पाणी वापरतात,
उन्हाळा असल्यामुळे आता काही अवस्था आहे माहित नाही
https://maps.app.goo.gl/J6jFkJjB1rVFsLD56
नांदगाणे मार्गे जाणार असाल तर वाटेत एक घर लागते सागर डोईफोडे याचे त्याच्याकडे तुमची जेवणाची सोय होईल.
खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.
सागर डोईफोडे - 90827 62931
मी खूप आधी गेलो होतो तेव्हा जेवणाची सोय सागर दादांनी केली होती.