aryanthorat2023
Aryan Thorat
January 20, 2026 at 04:57 PM

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ला आहे. त्याच्या चारही बाजूंनी खंदक आहे आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच त्या किल्ल्याखाली अनेक भूमिगत (

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ला आहे. त्याच्या चारही बाजूंनी खंदक आहे आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच त्या किल्ल्याखाली अनेक भूमिगत (अंडरग्राऊंड) मार्ग आहेत. मला असं वाटतं की ‘दुर्ग’ अ‍ॅपमध्ये हा किल्ला aasava .

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ला आहे. त्याच्या चारही बाजूंनी खंदक आहे आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच त्या किल्ल्याखाली अनेक भूमिगत (
12 Likes
4 Comments140 Views

Comments4

omkarmahadik227
Omkar MahadikJan 20, 2026

किल्ल्याच नाव काय आहे?

aryanthorat2023
Aryan ThoratJan 20, 2026

Paranda fort 🚩

1
aryanthorat2023
Aryan ThoratJan 20, 2026

परंडा किल्ला हा धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा शहरात असलेला एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला असून, तो बहामनी सल्तनतचे वजीर महमूद गवान यांनी १५व्या शतकात बांधला होता, जो लष्करी वास्तुकला आणि अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे, ज्यात भक्कम तटबंदी, मोठे बुरुज (ज्यावर 'हुसेन अरब' सारख्या तोफा होत्या), खंदक आणि अंतर्गत जलसाठ्यांचा समावेश आहे. हा किल्ला अनेक सत्तांतरांचा साक्षीदार आहे, ज्यात आदिलशाही, मुघल आणि निजामशाही यांचा समावेश आहे, तसेच शहाजी महाराजांनीही काही काळ तो ताब्यात ठेवला होता.
किल्ल्याची वैशिष्ट्ये:
बांधकाम: हा एक पॅरललोग्राम (समांतरभुज चौकोनी) आकाराचा भुईकोट किल्ला आहे, जो सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
संरक्षण: किल्ल्याला खोल खंदक आणि भक्कम तटबंदी आहे, ज्यावर २६ गोलाकार बुरुज आहेत.
तोफा: यात 'हुसेन अरब' आणि 'मुलुख मैदान' (रणरागिणी) यांसारख्या मोठ्या तोफा होत्या, ज्या डच कारागिरांनी बनवल्याचे मानले जाते.
अंतर्गत रचना: किल्ल्यात धान्य कोठारे, पाण्याची टाकी आणि शस्त्रागार (armories) आहेत.
धार्मिक स्थळे: प्राचीन महादेव मंदिर, नरसिंह मंदिर आणि एक मशीद येथे आहे.

2
www.abhi.savant
Abhijit SavantJan 20, 2026

परांडा चा भुईकोट म्हणजे स्थापत्य आणि युद्ध शास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा लागेल, कोटावरील बुरुजांची आणि बुरुजांवरील तोफांची रचना खरोखर अद्भुत आहे, पण सध्याची त्याची स्थिती पाहून थोडे वाईट वाटले खंदकाच्या भोवती आणि आत मधे झालेलं अतिक्रमण आणि कोटाच्या आत मूर्तींची झालेली दुरावस्था पाहून वाईट वाटले. कोटावरील कमान विहीर पण बघण्यासारखी आहे. स्थानिक पातळीवर जर या कोटाचे नीट संवर्धन झाले तर खरोखर लोक पैसे देऊन पहायला येतील नक्की.

1

Similar Posts

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )
Feb 26, 2026

राजगड किल्ला 🏰 राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानी किल्ला म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात, समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५१४ फूट उंचीवर वसलेला हा किल्ला इतिहासप्रेमी व ट्रेकर्ससाठी अतिशय खास आहे. ✨ वैशिष्ट्ये : राजवाड्याच

राजगड किल्ला 🏰 राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानी किल्ला म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात, समुद्रसपाटीपासून सुमारे ...
Oct 2, 2025

रांगणा किल्ला समाविष्ट केला आहे, त्याचा तालुका गगनबावडा असे म्हटले आहे. पण किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या दोन तालुक्यांच्या सीमेवर आहे. तरी सदर दुरुस्ती करावी. तसेच या किल्ल्याला पाटगावकडून सुद्धा जाता येतो.

रांगणा किल्ला समाविष्ट केला आहे, त्याचा तालुका गगनबावडा असे म्हटले आहे. पण किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या दोन त...
Jan 10, 2026

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

हरिहर (हर्षगड) ट्रेकिंगची पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा हा किल्ला. अत्यंत थरारक अशी वाट. एक असा किल्ला ज्याच्या टोकावरून बोललेला प्रत्येक शब्द हा गडाच्या पायथ्याशी ऐकू येतो. जेथे केलेली गर्जना ही संपूर्ण सह्याद्री मध्ये ऐकू येतील असा एक ब

हरिहर (हर्षगड) ट्रेकिंगची पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा हा किल्ला. अत्यंत थरारक अशी वाट. एक असा किल्ला ज्याच्या टोकावरून बोललेला प्रत्...
Mar 19, 2026