सिंहगड
गडावरील ठिकाणे:
- गडावर जाण्याच्या वाटासिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी. वर आहे. स्वारगेट पासून ५० क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. एका वेळीचे ₹ ६० आहेत, परंतु ₹ ७० चा पास चालत नाही, बाहेरून स्वारगेट ला येणाऱ्यांनी ₹१५० पास काढावा कारण हा पास सर्व मार्गांवर चालतो. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात. बस टीप – १ जानेवारीला बस संख्या कमी असते १ ते २ तास वाट पहावी लागते महानगरपालिका निवडणूक च्या आदल्या दिवशी आणि निवडणूक दिवशी बस संख्या कमी असते शक्यतो बसने जायचं टाळा
परिचय
सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
इतिहास
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ (नागा) नाईक यांच्या ताब्यात होता. इ.स. १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दक्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते. म्हणून त्याने कोळी साम्राज्यवर आक्रमण केले. त्यावेळी त्याच्यात आणि स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठे युद्ध झाले. पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला. त्यांनी तब्ब्ल 9 महिन्यपेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला. त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. असे सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे. पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला. सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला. पुढे निझामशाहीपर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव मालवणकर हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ. स. १६४७ मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदयभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तान्हाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत सुभेदार तान्हाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण माझा सिंह गेला" हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे. परंतु सिंहगड हे नाव त्याआधीपासूनच असल्याचेही आढळते. पहा सिंहगडाची लढाई गड आला पण सिंह गेला या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे. तान्हाजी मालुसरे म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, महाराजांचे आले. ही खबर कळून कूल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, मशाल, चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. एक प्रहर मोठे युद्ध झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरे (तान्हाजींचा भाऊ), याने हिंमत धरून, कूल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना आणि जिजाऊ मांसाहेबांना राजधानी राजगडावर सिंहगड जिंकल्याची पण सुभेदार तान्हाजी लढाईत धारातिर्थी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण माझा सिंह गेला'. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले. सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. स. १३५०) महंमद तुघलकाने इ. स. १३२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या महादेव कोळी राजाच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीत कोंढाण्याचे उल्लेख इ. स. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारासचे आहेत. इ. स. १६३५ च्या सुमारास कोंढाण्याचा सिद्दी जोहर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ. स. १६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला. शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले, तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.स.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला. इतिहासकार श्री.ग. ह. खरे यांच्या मते सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या मृत्यूची दुर्देवी घटना घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह. ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तान्हाजी मृत्यू प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांच्या ताब्यात राहिला.
सिंहगडावरील फुले
गिरीपुष्प अडुळसा धायटी सफेद टेकर