नारायणगड
गडावरील ठिकाणे:
- गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे१. मुकाई मातेचे मंदिर :- नारायणगडाच्या पायथ्याला मुकाईमातेचे सुंदर मंदिर आहे तेथे पाण्याची मोठी टाकी देखील बसवलेली आहे. नारायणगड हा किल्ला मध्ययुगातील आहे असे अनुमान आपण लावू शकतो. 'मुकाई ' मंदिराच्या मागून गडावर जायला सुंदर पायवाट आहे. २. हस्तमाता मंदिर :- या देवतेची मूर्ती अत्यंत देखणी आहे. नागपंचमीला व दसऱ्याला हस्ताबाईची मोठी जत्रा गडावर भरते. ही मूर्ती शस्त्र सज्ज असल्याची आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या समोर एक जुनी दगडी दीपमाळ देखील बघण्यासारखी आहे. ३. किल्लेदार वाडा (गणेश पट्टी, शरभ शिल्प) :- मंदिरापासून पूर्वेकडे झाडीमध्ये असलेले काही वाड्याचे अवशेष आहेत. येथेच नारायणाचे मंदिर असावे. प्रवेशद्वाराच्या बाहेर गणपती बाप्पाचि दगडात कोरलेली मूर्ती आहे.त्यापुढे शरभ शिल्प आहे. ४. पाणी टाकी समूह :- हे टाके समूह गडावरील सर्वात मोठे टाके असून ह्यात एकूण 5 टाक्या आहेत. गडावर अजून एक टाक दक्षिणेस आपण ज्या मार्गाने गडावर येतो त्याच बाजूला आहे. हे टाक देखील प्रशस्त आहे. ५. नारायण टाके :- उत्तर पूर्व बाजूला हे टाक आहे. ह्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. ६. देवदत्त गुफा :- गडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवदत्त गुहा. गडावर चढताना जुन्या कातळात कोरलेल्या पायऱ्या जेथून सुरू होतात तेथून उजव्या बाजूला एक पाउल वाट जाते. तेथून 100 फुटावर देवदत्त गुहा आहे. ह्या गुहेत 3 चोर वाटा दडलेल्या आहेत. अस सांगितला जात की या चोर वाटांनी शिवनेरी व इतर अजून काही ठिकाणी जाता येते. हे कितपत खरे आहे हे माहित नाही. ही तीनही भुयार बुजावण्यात आलेली आहेत. 18 व्या शतकात महानुभाव पंथाच्या मनुबाई अंकुळनेरकर यांनी येथे तपश्चर्या केली होती असा उल्लेख आढळतो. ७. कातळात कोरलेले पाउल:- सहसा ह्या पाउलाकडे कोणाचही लक्ष जात नाही. गड उतरताना कातळात कोरलेले पाउल दिसते. ह्या पाउलाबद्दल माहिती उपलब्ध नाही किंवा कुठे उल्लेख देखील नाही. हे पाउल कोणत्या काळातील असेल याचा देखील अंदाज नाही.
इतिहास
नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत सुरू झाला. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडात बांधली गेली. गडाचे बाकीचे काम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवे पदाची सूत्रे बाजीरावा कडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्याला दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगण्याचा ताबा मालोजीराजांकडे होता. शाहजी महाराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर – नारायणगाव ते चाकाण पर्यंतच्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्या मध्ये नारायणगड आणि खोडद गावाचा समावेश होतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत सुरू झाला.किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत झाली.हे काम नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली त्या विषयीची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशी मध्ये आली आहे. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीरावपेशव्याच्या कालावधीत पेशवाईची आर्थिक कारभार सदाशिवभाऊकडे होता सदाशिवभाऊ आर्थिक व्यवहारामध्ये दक्ष होता. इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा सक्तीचा आदेश चिटणीसी दप्तरामध्ये आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या "भारत छोडो " या आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडा वर राष्ट्रध्वज फडकविला होता. ही माहिती कळल्यावर इंग्रज पोलीस त्या गावकऱ्यांच्या शोधात खोडद गावामध्ये आले होते. पण गावकऱ्यानि त्या बाबत कहिहि माहिती दिली नाही.
पुस्तक
श्रीकांत फुलसुंदर आणि प्रा. लहू कचरू गायकवाड यांनी ’ऐतिहासिक दुर्ग नारायणगड’ नावाचे नारायणगडचा इतिहास सांगणारे एक पुस्तक लिहिले आहे. नारायणगावच्या. सनय प्रकाशन यांनी ते प्रसिद्ध केले आहे.
कसे जाल?
मुंबईहून माळशेज मार्गे १. जुन्नर - नारायणगाव वरून खोडदला येताना मध्ये माळवाडी म्हणून थाबा आहे थेतून उत्तरेस गडाचीवाडी आहे. गाडी अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. पुण्या वरून नाशिक कडे जाताना १. नारायणगाव वरून खोडदला येताना मध्ये माळवाडी म्हणून थाबा आहे थेतून उत्तरेस गडाचीवाडी आहे. गाडी अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. (नारायणगाव वरून नारायणगाव खोडद अशी प्रत्येक तासाला बस आहे.) गडावर आणि गड पायथ्याशी रहाण्याची व पिण्याच्या पाण्याची गडावर सोय आहे फक्त जेवण सोबत आणावे लागेल.