← सर्व किल्ल्यांकडे परत जा

रोहिलागड

जिल्हा:-
विभाग:मराठवाडा विभाग

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. रोहिलागड हा किल्ला जालना जिल्हातील एकमेव किल्ला आहे.सद्स्थितीला तो दुर्लक्षित आहे. गावात अनेक प्राचीन मंदिरे व त्या शेजारी भव्य कोरीव कामाच्या मूर्ती व शिलालेख पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

पत्ता

रोहिलागड तालुका:अंबड जिल्हा:जालना पिन कोड 431121 अंबड तालुका हा होळकरांच्या अधिपत्याखाली होता महिदपुर करारानंतर निजामाच्या अधिपत्याखाली तालुका आला आहे तर अंबड हे गौतमाबाईसाहेब होळकर यांना खाजगीसाठी अंबड परगणा पेशवे दरबारातुन मिळाले होते रोहिलागड हा येथे दोन कोरीव लेण्या असुन त्या अर्धवट आहे तर डोगंरावर काही बुरुज तसेच तटाचे अस्तित्त्व आहे तर शेजारच्या नांदीच्या डोगंरावर एक अर्धवट कोरीव लेणी असुन पूर्वी तेथे गौळी राजाचे वास्तव्य होते पायथ्याला गौळवाडी नावाचे गाव होते खिलजीच्या काळात गौळवाडीच्या गवळी व गोपाळांचे धंर्मातर झाले असून नांदी गावात रंगीबेरंगी दगडाचे मोठमोठे साठे आढळतात निजामाने या दगड उपशावर बंदी घातली होती मात्र संशोधनाअभावी इथे आजही मोठ्या प्रमाणात दगड उपसा होतो रोहिलागड, नांदी,भोकरदन येथील लेण्या एकच आहेत रोहिलागड गावात तीन शिलालेख असून दोन शिलालेख देवनागरीत असुन ते प्रवेशद्वार अर्थात वेशीवर असुन एक दर्ग्यात आहे यापैकी एकाच शिलालेखाचे वाचन झालेले आहेत प्राचीन अस्तीत्वाच्या खाणाखुणा या गावात पहायला मिळतात तट्टु,टकले,गुंजाळ, वैद्य तसेच इतर आडनावाची माणसे गावात राहतात. फिरंगाई माता,लेणी,भुयार, दर्गा,मंदिर, वेस,शिलालेख या गावात असुन अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे गावाच्या लेण्यांतील भुयाराची आख्यायिका रोहिलागड दौलताबाद किल्ला संबधी असून कधीकाळी गुंजाळ पाटील धनगरांची मेंढी लेणीतील भुयारातून दौलताबाद किल्ल्यातील भुयारात निघाली असल्याचे बोलले जाते - रामभाऊ लांडे