← सर्व किल्ल्यांकडे परत जा

रतनगड

जिल्हा:नगर.
विभाग:नाशिक विभाग
उंची: ४३०० फुट
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: मध्यम
पर्वतरांग: पश्चिम घाट
स्थापना: सुमारे इसवी सन.१६००-१७०० दरम्यान.

गडावरील ठिकाणे:

  • गडावर जाण्याच्या वाटा
    गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १ रतनवाडीहुन २ कुमशेतहुन शिवकालीन मार्गाने ३ साम्रदहुन

परिचय

रतनगड (डोंगरी किल्ला )हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे - १ - गणेश दरवाजा. २ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर) ३ - मुक्कामाची गुहा. ४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात) ५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष) ६ - कडेलोट पॉइंट. ७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज) ८ - प्रवरेचे उगमस्थान. ९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज. १० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे ) ११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.) ११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)

गडावरील राहायची सोय

गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.

गडावरील खाण्याची सोय

गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते.

गडावरील पाण्याची सोय

गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.

मार्ग =

कसे जाल ? मुंबईहुन/- कसारा - इगतपूरी- घोटी - वारांगुशी - नाशिकहून - घोटी - वरंगुशी - भंडारदरा - पुण्याहुन - संगमनेर - अकोले - राजूर - भंडारदरा(

जाण्यासाठी लागणारा वेळ

रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता ३ तास लागतात.