← सर्व किल्ल्यांकडे परत जा

प्रचितगड

जिल्हा: सांगली
विभाग: पुणे विभाग
तालुका: शिराळा

परिचय

प्रचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.

महत्त्वाची सूचना

चांदोली अभयारण्यातून वाट काढत जाण्यासाठी सोबत वाटाडे असणे महत्त्वाचे आहे. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हणले पाहिजे.

वैशिष्ट्य

रत्‍नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांची हद्द पार करून प्रचितगडावर पोहोचता येते व हा एक धाडसी अनुभव ठरतो.

पाहण्यासारखी ठिकाणे

चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली धरण कंधार डोह