← सर्व किल्ल्यांकडे परत जा

भूदरगड

जिल्हा: कोल्हापूर
विभाग: पुणे विभाग
तालुका: भुदरगड

परिचय

भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

इतिहास

हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. इ.स. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलशाही|मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. ऑक्टोबर १३ १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

कसे जाल

कोल्हापूरपासून गारगोटी व नंतर गारगोटीपासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस. टी. महामंडळाची बस आहे.