KUNAL AMBERKAR
July 20, 2026 at 05:38 PM
१९ जुलै रोजी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य गांजराई (कथित सिक्रेट वॉटरफॉल) धबधब्यावर आयोजित केलेला वॉटरफॉल रॅपलिंग कुणाल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाले.मुंबई वरून ५ जणांनी यात सहभाग घेतला होता.वॉटरफॉल रॅपलिंग सोबत एक छोट
१९ जुलै रोजी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य गांजराई (कथित सिक्रेट वॉटरफॉल) धबधब्यावर आयोजित केलेला वॉटरफॉल रॅपलिंग कुणाल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाले.मुंबई वरून ५ जणांनी यात सहभाग घेतला होता.वॉटरफॉल रॅपलिंग सोबत एक छोटेखानी ट्रेकच झाला. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, रिमझिम पडणारा पाऊस आणि धबधब्याच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरला. सहभागींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत प्रत्येकाने रॅपलिंगचा थरार अनुभवला. ग्रुप मधील ३ जणांनसाठी हा आयुष्यातील पहिलाच असा रोमांचकारी अनुभव होता. निसर्गाच्या सान्निध्यात साहस आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या अविस्मरणीय आठवणी कायम मनात राहतील.

3 Likes
0 Comments50 Views