← सर्व किल्ल्यांकडे परत जा
पारोळयाचा किल्ला
जिल्हा:जळगाव
उंची: ० 525फूट
प्रकार: भुईकोट
कठीणता: अत्यंत सोपी
जवळचे गाव: पारोळा,जळगाव
सद्यस्थिती: व्यवस्थित
परिचय
पारोळ्याचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पारोळा हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. ह्या किल्लाचे झांशीचे राजघराणे नेवाळकर कुटुंब जहागीरदार होते. हा किल्ला सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी सन १७२७ मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी या भुईकोट किल्याची बांधणी केली होती. राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांचा ऐतिहासिक वारसा ह्या किल्ल्याला लाभला आहे.