← सर्व किल्ल्यांकडे परत जा
कंक्राळा
जिल्हा:नाशिक
उंची: 2400 फूट
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: मध्यम
परिचय
कंक्राळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील एक किल्ला आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून हा ओळखला जातो.
कसे जाल?
नाशिकहून मालेगाव आणि तेथून १५ किलोमीटर अंतरावर करंजगव्हाण हे गाव आहे. करंजगव्हाण गावापासून ५-७ किमी अंतरावर कंक्राळा हे गड पायथ्याचे गाव आहे. गावातून गडाचा मार्ग आणि घळ दिसते. तीच घळ पकडून गडावर जाता येते. अर्ध्या तासात डोंगरातली खिंड लागते. येथे तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गुहा आणि पाण्याची टाकीही या भागात आहेत.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
ढासळलेली तटबंदी, बुरूज आणि महाद्वाराचे कोरीव काम
गडावरील पाण्याची सोय
गडावर पाण्याची अनेक टाकी आहेत.