← सर्व किल्ल्यांकडे परत जा

खैराई

जिल्हा:नाशिक
उंची: २२९६ फूट
प्रकार: गिरीदुर्ग
कठीणता: अत्यंत अवघड
जवळचे गाव: ठाणापाडा
पर्वतरांग: कळसुबाई
सद्यस्थिती: बिकट

इतिहास

शिवकाळात हा गड मोघलांचा जहागीरदार बनलेल्या कोळी राजाच्या ताब्यात होता. इ.स. १६७६ मध्ये संपूर्ण रामनगरचा भूभाग जिंकताना छत्रपती शिवरायांनी खैराई किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला इ.स. १७९० मध्ये पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेवर जात असताना या किल्ल्यावर १ जानेवारी १६६४ रोजी आले होते.

गडावरील ठिकाणे

खैराईचा गडमाथा छोटेखानीच असला तरी गडावर पाण्याची सुकलेली अनेक टाकी, दोन लहान तोफा, खोदीव पायऱ्या, एक लाकडी चौकट असलेले उघड्यावरील वेताळाचे मंदिर, एक भग्न वास्तूचा चौथरा, काही उध्वस्त बुरुज व बऱ्यापैकी शाबूत असलेली तटबंदी या गोष्टी नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. या किल्ल्यावरून आग्नेयेला त्रिकोणी आकाराचा वाघेरा किल्ला व दूरवर उतवड, हरिहर व त्र्यंबकगडाची पुसटशी रांग दिसते.

मुक्काम

एका दिवसात रामसेज किल्ला, वाघेरा किल्ला, आणि खैराई किल्ला हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येते.