← सर्व किल्ल्यांकडे परत जा

बाळापूर किल्ला

जिल्हा:-
विभाग:विदर्भ विभाग
प्रकार: fortress
स्थापना: इ.स. १७२१

परिचय

लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा. लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा. प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा. लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा बाळापूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.

इतिहास

सुभेदार मल्हारराव होळकर बढवाणीचा शासक मोहन सिंग यांच्या वतीने बाळापुरच्या लढाईत उतरले. त्यांचा पराक्रम पाहुन पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी स्वराज्यात ५०० अश्वाचे मनसबदार केले.

गडावरील ठिकाणे

बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे.

मुख्य जागा

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

किल्ला जतन

ह्या किल्ल्याचा बुरुज गुरुवार,दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोसळला.