← सर्व किल्ल्यांकडे परत जा

बहादूरवाडी

जिल्हा: सांगली
विभाग: पुणे विभाग
तालुका: वाळवा

परिचय

बहादूरवाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहादूरवाडी हा स्थलदुर्ग आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर तांदुळवाडी गावातून डाव्या बाजूस एक फाटा लागतो , तेथून ३ कि.मी. अंतरावर बहादूरवाडी गाव लागते. गावातच हा भुईकोट किल्ला आहे या कोटाचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे, भुईकोटाची तटबंदी अजून शाबूत आहे,आत प्रवेश केल्यानंतर बुरुज, अर्धवट भिंती असे काही अवशेष दिसून येतात. आकाराने हा भुईकोट तसा छोटासाच आहे. सध्या इथे काहीच वावर नसल्यामुळे झाडा-झुडपांची दाटी झालेली आहे. संपूर्ण भुईकोट फिरण्यास अर्धा तास पुरेसा आहे.