R
Rahul Lele
January 16, 2026 at 03:18 PM

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)

0 Likes
4 Comments94 Views

Comments4

shindadev118
Vaibhav ShindadeJan 16, 2026

2 वाटा आहे

1
www.abhi.savant
Abhijit SavantJan 16, 2026

Actually 4 मार्ग आहेत,

  1. वेल्हे मार्गे : तसा सोपा आहे कारण बाकीच्या 3 पेक्षा थोडा सोपा, 2 ते 2:30 तास लागतील
  2. मेटपीलावरे मार्गे: वेल्हेपेक्षा अवघड आणि स्की असलेला रस्ता कारण बारीक खडी असते पायवाटेवर उभी चढाई आहे, हा रस्ता कोकण दरवाजा साईड ला मिळतो.
  3. बुधला माची मार्गे: हा रस्ता राजगड ते तोरणा ट्रेक च्या रस्त्याला मिळतो. खोपेटे वाडी किंवा जोरकर वाडी मधून एक पायवाट कचरे मामा जिथे राहतात त्या टेकडीवर येतो तिथून तुम्ही राजगड ते तोरणा रस्त्याने बुधला माचीवर शिडीने जाऊ शकता.
  4. भट्टी मार्गे: हा तोरणा वर जायचा सगळ्यात अवघड आणि कमी वापरात असलेला मार्ग. वेल्हे गावच्या पुढे 6-7 किमी वर भट्टी गाव आहे, गावच्या थोडे बाहेर वाळंजाई देवीचे मंदिर आहे मंदिरामागून वगळीच्या मार्गाने एक पायवाट सरळ उभी चढण घेत तोरणावर येते, ही पायवाट फार कमी वापरलेली आहे त्यामुळे माहित असेल तरच या वाटेने जावे. तसेच खूप घसारीचे टप्पे आहेत. ही वाट तुम्हाला वाळंजाई ठाण्यावर आणते. तिथून थोडे पुढे वाळंजाई दरवाजा आहे. वाळंजाई ठाण्यापासून दरवाजापर्यंत थोडे जपून जावे. पुढे हा रस्ता बुधला माचीकडे जाणाऱ्या रस्त्याला मिळतो.
2
gautam.vadalkar35
Gautam VadalkarJan 16, 2026

वेल्हे गाव ही सोपी वाट आहे .कमीत कमी 2 तास

1
pradeeppatne94
pradeep patneJan 16, 2026

मी आत्ताच मागच्या महिन्यात जाऊन आलो आहे.वेल्हे मार्ग योग्य आहे.मी व्हिडिओ बनवला आहे व युट्यूबवर अपलोड केला आहे. आवश्यक असेल तर पाहणेhttps://youtu.be/UdXZ9tJEH6Q?si=yFMGRq285sb2qz8v

3