rautk0581
Ketan Raut
March 28, 2026 at 10:07 AM

*बा रायगड परिवार, आयोजित* *अविस्मरणीय कोकण वारसा मोहीम २०२६*🚩 *तटबंदीला पराक्रमाचा गंध अन् लाटांना इतिहासाचा ध्यास, आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधणारी ही 'अविस्मरणीय वारसा मोहीम' सार्थ..🚩* दिनांक : ११ आणि १२ एप्रिल, २०२६ ठिकाणे : • सुवर्णदुर्ग • ⁠ गो

बा रायगड परिवार, आयोजित
अविस्मरणीय कोकण वारसा मोहीम २०२६🚩

तटबंदीला पराक्रमाचा गंध अन् लाटांना इतिहासाचा ध्यास, आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधणारी ही 'अविस्मरणीय वारसा मोहीम' सार्थ..🚩

दिनांक : ११ आणि १२ एप्रिल, २०२६

ठिकाणे :
• सुवर्णदुर्ग
• ⁠ गोवागड
• ⁠ कनकदुर्ग
• बाणकोट
• नाना फडणवीस जन्मस्थळ
• वेळास कासव महोत्सव
• हरिहरेश्वर मंदिर व प्रदक्षिणा
• आरवी बीच
• दिवेआगार सुवर्ण गणेश मंदिर

जिथे सह्याद्रीचे अभेद्य सुळके इतिहासाच्या जखमांना पराक्रमाची लेणी म्हणून मिरवतात आणि अरबी समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा शतकानुशतके आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची आरती ओवाळतात..!
बा रायगड परिवारासोबत निघालेली ही केवळ एक भटकंती नाही, तर रक्ताच्या प्रत्येक थेंबात सळसळणाऱ्या स्वाभिमानाची ही एक 'परिक्रमा' आहे.

सुवर्णदुर्ग आणि बाणकोटच्या त्या बुलंद तटबंदीवर पाऊल ठेवताच, काळजाच्या प्रत्येक ठोक्यासोबत शिवरायांच्या आरमाराचा तो अजेय हुंकार आणि कान्होजी आंग्रेंच्या शौर्याचा रोमांच अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही. वेळासच्या वाळूत निसर्गाचा आदिम चमत्कार डोळ्यांत साठवताना कृतज्ञ वाटतं, तर मुत्सद्देगिरीचा मेरुमणी नाना फडणवीसांच्या जन्मभूमीत त्या धगधगत्या इतिहासाचा स्पर्श थेट आत्म्याला होतो..🚩

हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणेत जेव्हा अथांग सागर आणि उत्तुंग सह्याद्री एकमेकांच्या मिठीत विसावतात, आरवीच्या अथांग किनाऱ्यावर मन शांत होतं आणि दिवेआगारच्या सुवर्ण तेजाने अवघं अस्तित्व उजळून निघतं, तेव्हा एक जाणीव प्रकर्षाने होते हा प्रवास केवळ एका भूगोलाचा नाही हा तर सह्याद्रीच्या रांगड्या मातीत आणि समुद्राच्या धीरगंभीर गाजेत, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची मशाल पेटवून स्वतःच्या अस्तित्वाच्या विखुरलेल्या खुणा शोधण्याचा एक थरारक आणि भावनिक शोध आहे..🚩

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून समूहात सहभागी व्हा..!
https://chat.whatsapp.com/BAtpeG7BpHiLSOcCJAc7Yg?mode=gi_t

संपर्क :
किसन कोतेरे: 8655319730
निनाद सावंत: 8652393453
विकास फडतरे: 7798847904

धन्यवाद…!
बा रायगड परिवार, महाराष्ट्र राज्य

1 Likes
1 Comments219 Views

Comments1

www.abhi.savant
Abhijit SavantMar 30, 2026

बा रायगड परिवारासोबत मोहीम नक्की करा कारण जो काही मोहिमेत नफा मिळतो तो गड संवर्धनासाठी वापरला जातो परिवाराची टीम अनुभवी आहे त्यामुळे बिनधास्त परिवारासोबत ट्रेक करू शकता, यात कोणतेही प्रमोशन नाही.

1

Similar Posts

*🚩टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार आयोजित*    ⛰️*किल्ले विचित्रगड दुर्ग संवर्धन मोहीम* (रोहिडा) *🚩 मोहीम क्र. ३०* गडकिल्ले हे संपुर्ण हिंदुस्थानचे वैभव आणि शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. त्या गड दुर्गांची परिस्थिती बघता महाराज अस्वस्थ असतील. का

🚩टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार आयोजित ⛰️ किल्ले विचित्रगड दुर्ग संवर्धन मोहीम (रोहिडा) 🚩 मोहीम क्र. ३० गडकिल्ले हे संपुर्ण हिंदुस्थानचे वैभव आणि शिव...
May 8, 2026

30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )

30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )
Apr 27, 2026

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
Dec 20, 2025