माहीम
परिचय
माहीम हा मुंबई शहराचा एक भाग आहे. हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. ह्या भागांना मुंबईतील तालुका म्हणतात. माहीम रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेवरील मुंबई शहरातले शेवटचे स्थानक आहे. त्यानंतर मुंबईची वांद्रे आदी उपनगरे सुरू होतात.
प्रेक्षणीय स्थळे
माहीम येथील प्रेक्षणीय स्थळांमध्ये जुन्या वास्तुशैलीत असणारे मुंबईतील सर्वात जुने शितळादेवीचे मंदिर अंदाजे सन १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी बांधले. माहीमध्ये सेंट मायकल चर्च नावाचे एक कॅथॉलिक चर्च आहे, माहीम चर्च म्हणून ते ओळखले जाते. माहीममध्ये बाबा मखदूम शाह दर्गा (माहीमचा दर्गा) आहे हे तिन्ही प्रार्थनास्थळे एका त्रिकोणाच्या टोकांवर येतात. माहीम कॉजवेच्या जवळ स्वामी विवेकानंद उद्यान आहे. संयुक्त महाराष्ट्र कलादालन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय जलतरण तलाव येथेच आहे, आणि त्याचबरोबर मनमाला देवीचे मंदिर आहे. ज्याला माहीम निसर्ग उद्यान या नावाने ओळखले जाते, ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान धारावी-शींव (सायन) येथे माहीमच्या पूर्वेला आहे.