← सर्व किल्ल्यांकडे परत जा

जुन्नर

जिल्हा: पुणे
विभाग: पुणे विभाग
तालुका: जुन्नर

परिचय

१९° १२′ ००″ N, ७३° ५२′ ४८″ E ओपनस्ट्रीट मॅप गूगल अर्थ प्रोक्सिमिटीरामा जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला या शहरापासून जवळच आहे.

कसे पोहचाल

कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने बनकरफाटा येथे उतरून तेथून जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे आल्यावर, बस बदलून नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसनेपारगाव तर्फे मढ येथुन गणेशखिंड मार्गे जुन्नरला पोहचता येते . 2. पुणे शहरातून थेट बस सुविधा आहेत.

इतिहास

जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.

अन्य वैशिष्ट्ये

जुन्नरजवळ खोडद या गावी खगोलशास्त्रीय संशोधनासाठी वापरला जाणारा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप नावाचा रेडिओ दुर्बिणींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील रेडिओ दुर्बीण वर्णपट ग्रहणक्षमतेत जगात दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली दुर्बिणी आहेत [ संदर्भ हवा ]. निमगाव सावा येथे संत मनाजीबाबा पवार यांची संजीवन समाधी आहे.